पुण्यात इराणी विद्यार्थीनीकडे प्राध्यापकानी केली शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:30 IST2017-08-10T12:29:21+5:302017-08-10T12:30:36+5:30

शिक्षणाचं माहेर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख आहे. याच पुण्यात परदेशातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात.

Demand for bodybuilding was done by the Irani students in Pune | पुण्यात इराणी विद्यार्थीनीकडे प्राध्यापकानी केली शरीरसुखाची मागणी

पुण्यात इराणी विद्यार्थीनीकडे प्राध्यापकानी केली शरीरसुखाची मागणी

पुणे, दि. 10 -  शिक्षणाचं माहेर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख आहे. याच पुण्यात परदेशातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. अशाच एका शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थिनीकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापकानी शरीरसुखाची मागणी करत, गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम केले असल्याचे समोर आले आहे. याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राध्यापकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पौड रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात इराण येथील एक विद्यार्थिनी पीएचडीचे शिक्षण घेण्याच्या उद्देशाने प्रवेश घेण्यासाठी आली होती. यावेळी मंगळवार (दि. 8) रोजी दुपारी साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास ती प्रवेशाबाबत महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांना ती भेटली. मात्र शिवाजी बोऱ्हाडे यांनी तिला प्रवेश देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तिने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी घाबरलेल्या त्या इराणच्या तरुणीने याबाबत इराणमधील आपल्या पालकांना कळवले. तर पालकांनी केलेल्या सूचनेनुसार सदरील विद्यार्थिनीने कोथरूड पोलीस स्टेशन गाठत घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना अवगत करत, तक्रार दिली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

Web Title: Demand for bodybuilding was done by the Irani students in Pune