शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

तुटता तुटेनात रेशिमबंधाच्या नाजूक निरगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:19 IST

पती-पत्नीतील तक्रारी राहत आहेत कायम : पोटगी व मुलांच्या ताब्याचा मुद्दा ऐरणीवर

पुणे : वैचारिक मतभेद, छोट्या बाबींवरून होणारे वाद, विवाहबाह्य संबंध अशा प्रकारच्या कारणांवरून घटस्फोट घेतल्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. काडीमोड झाल्यानंतर त्यांच्यातील हे वाद मिटतील आणि दोघेही आपआपल्या मार्गाला लागतील अशी आशा त्यांच्या जवळच्या व्यक्ती बाळगतात. मात्र काही प्रकरणात जोडप्यांमधील नाते संपले असले तरी त्यांच्यातील वाद सुरूच राहतात. वेळेवर पोटगीची रक्कम मिळत नाही म्हणून आणि मुलांचा ताबा कोणाकडे राहिल, यावरून हे वाद होत आहेत.

संमतीने घटस्फोट घेतला असेल तर हे प्रश्न त्याच वेळी मिटविण्यात येतात. मात्र घटस्फोटाला एकाची संम्मती नसलेल्या दाव्यात असे प्रकार घडत आहे. मुलांच्या हक्काबाबत तसेच त्यांची जबाबदारी कोण घेणार, त्यांना कधी भेटता येवू शकते याबाबत सरासरी ७० तर पोटगी वेळेत मिळत नाही, पोटगीची रक्कम वाढवून पाहिजे, याबाबत सरासरी २०० तक्रारी दरवर्षी शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहेत, अशी माहिती दी पुणे फॅमिली कॉर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी दिली. विभक्त झालेल्या जोडप्यातील वाद घटस्फोटानंतरही थांबलेले नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पोटगीच्या दाव्यांमध्ये आई - वडिलांनी मुलाविरोधात किंवा मुलांनी आई -वडिलांविरोधात दाखल केलेले खटले देखील समाविष्ट आहे. मात्र या दोन्ही दाव्यांची संख्या अंत्यत कमी आहे. हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा हे विशेष कायदे तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ या कायद्यानुसार पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पत्नी नोकरी करीत असेल मात्र तिला कमी पगार असेल तर तिलाही पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पतीचे उत्पन्न किती आहे. त्यानुसार पत्नीला दरमहा किती पोटगी द्यायची याची रक्कम ठरवली जाते. घटस्फोट घेताना पती ही रक्कम देण्याचे मान्य करीत असतो. मात्र अनेकदा ती वेळच्या वेळी दिली जात नाही. त्यामुळे पत्नी पुन्हा न्यायालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे.

वेळेत व ठरलेली पोटगी मिळत नाही म्हणून पत्नीने अर्ज केल्यास न्यायालय पतीच्या नावावर असलेल्या वस्तू विकून पोटगी देते. तर पतीच्या नावावर काही मालमत्ता नसेल, पण तो नोकरदार असेल तर पत्नीचे खाते पतीच्या खात्याला जोडण्यात येते. पतीचा पगार झाल्यानंतर पोटगीची रक्कम आपोआपच पत्नीच्या खात्यावर जमा होते. या दोन्ही बाबीकरूनही पत्नीला दिलासा मिळत नसेल तर पतीविरोधात अटक वॉरंट देखील बजाविण्यात येवू शकते.पती किंवा पत्नी व्यसनी असेल किंवा दोघांमधील वाद अगदी टोकाचे असतील तर पालक आणि मुले कौटुंबिक न्यायालयात देखील भेटू शकता. तशी सोय न्यायालयात करण्यात आली आहे.अटक टळावी म्हणून पोटगीसंपत्ती विकून किंवा पगाराचे खाते अटॉचकरूनही पोटगी मिळत नसेल तर पती विरोधात अटक आॅरंट काढण्यात येते. अशा वेळी अटक नको म्हणून पती पोटगी देतो. मात्र त्यावेळी थकलेली सर्व पोटगी एकाच वेळी द्यावी लागते. काही प्रकरणात तर पतीला अटक देखील झाली आहे. त्यामुळे पोटगीतून पतीची सुटका होत नाही. पत्नीच्या उपजीविकेसाठी त्याने तेवढी रक्कम देणे अपेक्षितच आहे, अशी माहिती अ‍ॅड. आम्रपाली कांबळे-कसबे यांनी दिली.कौटुंबिक न्यायालयाच्या तळमजल्यावर चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात ते ठरलेल्या वेळेनुसार मुलांबरोबर वेळ घालवू शकतात.मुलांचा ताबा कोणाकडे असणार किंवा ताबा मिळाल्यानंतर त्यांना भेटू न देते, त्यांची जबाबदारी न उचल्याचे प्रकार देखील घडत आहेत. संमतीने घेण्यात येणा-या घटस्फोटात या बाबी आधीच ठरविण्यात येत असतात. मुले जर लहान असतील तर शक्यतो त्यांचा ताबा आईकडे देण्यात येतो. मात्र मुले मोठी असतील तर दोन्ही बाजू समजावून घेवून न्यायालय वडिलांकडे देखील मुलांचा ताबा देवू शकते. त्यानंतर त्यांना कधी व कुठे भेटायचे हे देखील ठरविण्यात येते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांना भेटू न दिल्याने पुन्हा वादास सुरुवात होते.कौटुंबिक न्यायालयात भेटण्याची सोय 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrimeगुन्हा