शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अपमान, उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल - जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:30 IST

"मराठा समाजाचा अंत पाहू नका. उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल," असा इशारा त्यांनी सरकारला दिला

नारायणगाव : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी नारायणगाव येथे मराठा समाजाच्या सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी मराठा समाजाचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप करत, जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी फक्त एका दिवसाची परवानगी देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. "मराठा समाजाचा अंत पाहू नका. उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल," असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झाल्यानंतर नारायणगाव येथे आयोजित सभेत जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. पण सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. माझ्या मराठी युवकाला जर आंदोलनादरम्यान काठीचा एक फटकाही लागला, तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल,’ असा कडक इशारा त्यांनी दिला.जरांगे यांनी नारायणगावातील सभेतील गर्दी ही आतापर्यंतच्या आंदोलनातील सर्वात मोठी गर्दी असल्याचे नमूद केले. "पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मला नेहमीच साथ दिली. आता मुंबईतील आंदोलन लांबलं, तरी पुणे जिल्ह्यातील मराठा समाज माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि मुंबईत शिद्दा पुरवेल," असे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या उद्रेकाचे कारण सरकारचा टाळाटाळीचा दृष्टिकोन असल्याचे जरांगे यांनी अधोरेखित केले. "मराठा समाजाला संपवण्याचा डाव फडणवीस सरकारचा आहे. पण आम्ही हा अपमान सहन करणार नाही," असे त्यांनी ठणकावले. या सभेला मराठा समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते, ज्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस