Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:55 IST2020-02-11T14:34:44+5:302020-02-11T14:55:43+5:30
दिल्ली विधानसभा निकालावर बाेलताना हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रीया राेहीत पवार यांनी दिली.

Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला
पुणे : भाजपाने संपूर्ण मंत्री आणि बारा मुख्यंमंत्री दिल्लीत प्रचाराला लावले तरी त्यांचा पराभव झाला. दिल्लीत सत्याचा विजय झाला आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार राेहीत पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त पवार आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते.
दिल्ली विधानसभेचे निकाल समाेर येत असून आम आदमी पक्षाला (आप) बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग तिसऱ्या वेळेस आपचे सरकार दिल्लीत येत आहे. दिल्लीच्या निकालावर बाेलताना राेहीत पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन. भाजपाने संपूर्ण मंत्री, बारा मुख्यमंत्री प्रचारात उतरवले तरी त्यांचा पराभव झाला आहे. दिल्लीत सत्याचा विजय झाला. अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आरोग्य अशा लोकांच्या समस्यांना प्राधान्य देत या क्षेत्रात चांगले काम केले त्याला लोकांनी स्वीकारले, आगामी पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेश निवडणुकीमध्ये भाजपविराेधी पक्षांनी एकत्र लढायला हवे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी राेहीत पवार यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांना भेट दिली हाेती. तसेच दिल्लीच्या शाळांचे त्यांनी काैतुक केले हाेते. तसेच राज्यात देखील अशा शाळा निर्माण व्हाव्यात अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली हाेती.