पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:13 PM2019-05-23T15:13:08+5:302019-05-23T15:14:50+5:30

पुणे लोकसभा मतदार संघात अतिशय संथ गतीने मोजणी होत असून दुपारी अडीच वाजेपर्यंत 6 वी फेरी संपली नव्हती...

Delay in pune results.. More than problem in counting | पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..

पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..

Next

पुणे : पुणे लोकसभा मतदान मोजणीत विविघ घोळ पाहायला मिळाले. त्यामुळे काही मतमोजणी सुरु असताना मशीन बंद न करणे, मतदानाची वेळ संपण्यापूर्वी मशीन बंद केल्याची वेळ नोंदविली जाणे, मशीन सुरू न होणे अशा प्रकारची जास्त चर्चा होत आहे.घोळांमुळे पुण्याचा निकाल लागण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ होणार असल्याची चर्चा आहे.. 

कसबा पेठ मतदार संघातील 76 नंबर चे बूथ वरील मशीनचा सुरू झाले नाही, त्यामुळे तेथे व्हीव्हीपॅट चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... अनेक मशिनवर मशीन बंद केल्याची वेळ 5. 43, 5. 53, 5. 47 अशी दाखवली गेली आहे. शिवाजीनगरमध्ये 3 मशीन बंद केली नसल्याचे 6 फेऱ्यांमध्ये आढळून आले आहे. त्यातील एका मशीनमधील 90 टक्के मते गिरीश बापट यांना मिळाली होती, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. पुणे लोकसभा मतदार संघात अतिशय संथ गतीने मोजणी होत असून दुपारी अडीच वाजेपर्यंत 6 वी फेरी संपली नव्हती. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होण्यास पहाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

...........

पुणे आणि बारामती मतदारसंघातील मोजणी योग्य पद्धतीने सुरू आहे. पुणे मतदारसंघातील मतमोजणीला वेळ लागत असल्याचे दिसत असले तरी कोणताही तांत्रिक बिघाड नाही. निरीक्षक नियमांचे काटेकोर पालन करून सर्व प्रक्रिया अचूक पार पाडत आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये कोणताही गोंधळ आढळून आलेला नाही. सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुणे आणि बारामती मतदारसंघातील निकाल स्पष्ट होतील, असा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

Web Title: Delay in pune results.. More than problem in counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.