शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाम भूमिका असलेला अर्थसंकल्प

By admin | Updated: March 8, 2015 00:59 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल,

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाम भूमिका मांडलेली दिसते. या अर्थसंकल्पाचे दूरगामी परिणाम काय होतील हे आगामी काळच ठरवेल, असे प्रतिपादन ‘नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट’री (एनएसडीएल)चे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी आज येथे केले. दि कॉसमॉस को-आॅपरेटिव्ह बँक आणि गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स यांच्या तर्फे टिळक यांचे ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मधुकर अत्रे, ‘नॅफकॅब’चे अध्यक्ष आणि कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे, गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्सचे प्राचार्य एन. एस. उमराणी, कॉसमॉस बँक संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य उमराणी यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. विक्रांत पोंक्षे यांनी टिळक यांचा परिचय करून दिला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी टिळक यांचा सत्कार केला. उपप्राचार्य आनंद लेले यांनी आभार मानले. मिनोती दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)‘अच्छे दिन’ मिळवावे लागतीलया अर्थसंकल्पाचे वर्णन पाच ‘पी’ मध्ये करता येईल. यामध्ये पेट्रोल, पोस्ट, पेन्शन, प्रायसिंग, पोझिशन आणि पेशन्स यांचा समावेश करायला हवा. अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प ‘कॉर्पोरेट’धार्जिणा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. मात्र, तशी परिस्थिती दिसत नाही. आगामी काळाचा विचार करून, एक ठाम विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. याचे नेमके परिणाम काय होतील- हे आगामी काळच ठरवेल. जेटली यांनी अर्थसंकल्पाद्वारे ‘फूल भी खिलाएँ और गुल भी खिलाएँ’ असे म्हणावे लागेल. मोदीसरकार ‘अच्छे दिन..’चा वादा करीत असले, तरी हे ‘अच्छे दिन’ बायपोस्ट आपल्यापर्यंत येणार नाहीत, तर ‘अच्छे दिन’ आपल्याला मिळवावे लागतील, असे टिळक म्हणाले.