Pune Crime: सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत तरुणीची बदनामी; औंधमधील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 17, 2023 16:33 IST2023-08-17T16:32:33+5:302023-08-17T16:33:00+5:30
हा प्रकार ६ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे...

Pune Crime: सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत तरुणीची बदनामी; औंधमधील घटना
पुणे : सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याचा वापर करत तरुणीचे फोटो आणि अश्लील संदेश पाठवल्याची घटना औंध परिसरात घडली. हा प्रकार ६ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, कोणीतरी अनोळखी आरोपीने स्वतःची ओळख लपवून, तरुणीचे नाव आणि फोटो असलेले बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले.
तसेच लिंक्डइनवर प्रोफाइल तयार करून तिच्या नावे बदनामीकारक संदेश पाठवले. सोबतच बनावट व्हाॅट्सॲप खाते तयार करून त्याद्वारे तरुणीच्या भाऊ आणि बहिणीच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर तरुणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले.