शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावमधील १३ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST

नारायणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत इमारत १३ ...

नारायणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायत इमारत १३ किलोवॅट सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला, अशी माहिती सरपंच योगेश (बाबू) यांनी दिली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. प. सदस्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, ग्रामविकास अधिकारी नाईकडे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला.

यावेळी नारायणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिकांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी एकनाथ शेटे, दिलीप गांजळे, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, ज्ञानेश्वर खळदे, मारुती फुले, रोहिदास तांबे, अरविंद ब्रम्हे, मंगल चिंतामणी, उद्योजक अभय कोठारी, किसन डेरे, ॲड. कुलदीप नलावडे, ॲड. राजेंद्र कोल्हे आदी उपस्थित होते.

सरपंच योगेश पाटे म्हणाले की, या सौरऊर्जा प्रकल्पावर नारायणगाव गावठाण हद्दीतील स्ट्रीट लाईट चालणार असून दर महिन्याला येणार्‍या जवळपास १ लाख रुपये बिलात सुमारे ५० ते ६० टक्के बचत होणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे १० ते १५ हजार रुपयांच्या बिल रकमेची बचत होऊन या रकमेचा सद्पयोग गावच्या विकासासाठी करता येईल . ग्रामपंचायत पातळीवरचा हा सर्वात मोठा स्ट्रिटलाईट व इमारत सौरउर्जा प्रकल्प असल्याची माहिती पाटे यांनी दिली.

आशा बुचके म्हणाल्या की, नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गॅस शवदाहिनी, पाणी पुरवठा योजना, भव्य गार्डन, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवरचा सर्वात मोठा सोलर प्रकल्प असे अनेक पथदर्शी प्रकल्प राबविले जात असुन सरपंच योगेश पाटे यांच्या अधिपत्याखाली नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार केला जातोय ही कौतुकाची बाब आहे. यापुढच्याही काळात अधिक चांगल्या पद्धतीने गावचा विकास होईल असे सांगून ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. सरपंच योगेश पाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

२३ नारायणगाव

१३ किलोवॅट सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण करताना आशा बुचके, संतोष खैरे, दिलीप गांजाळे, नाईकडे , योगेश पाटे, सारिका डेरे व इतर.