दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:21 PM2023-09-13T14:21:29+5:302023-09-13T14:27:09+5:30

मृतदेह हा पुरुषांचा असून, त्याचे अंदाजे वय ३० वर्षे आहे...

Decomposed body found in Dighi area; Suspected to have died eight days ago | दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय

दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय

googlenewsNext

पिंपरी :दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पठारे मळा येथे शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह हा पुरुषांचा असून, त्याचे अंदाजे वय ३० वर्षे आहे. या व्यक्तीचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यतादेखील पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत असून आसपासच्या लेबर कॅम्पमध्ये कोणी हरवले आहे का, याचीदेखील तपासणी करत आहेत.

Web Title: Decomposed body found in Dighi area; Suspected to have died eight days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.