शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आयोगाचे निवडणुकीतील दर निश्चित ; वडापाव १२, पुरीभाजी २५ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 8:58 PM

निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून ते थेट मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज सादर करावा लागतो.

ठळक मुद्देउमेदवाराच्या खर्चासाठी जिल्हादर सुची उमेदवाराला खर्चासाठी ७० लाख रूपयांची मर्यादापोस्टर, बॅनर या प्रचार साहित्याचीही दरसुची
पुणे : निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या दिलेल्या खर्चासाठी जिल्हा दर सुचीमध्ये वडापाव १२ रुपये नग व पुरीभाजी २५ रुपये नग असे दर दिले आहेत. आयोगाने दिलेल्या दरापेक्षा जास्त दर असेल तर चालेल, पण त्यांनी दिलेल्या दरापेक्षा कमी दर मात्र मंजूर केले जाणार नाहीत, असे आयोगाकडून स्पष्ट केले आहे. उमेदवाराला खर्चासाठी ७० लाख रूपयांची मर्यादा असून त्याला आता कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावरही मर्यादा आणावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून ते थेट मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज सादर करावा लागतो. या खर्चात उमेदवाराकडून अनेकदा बऱ्याच वस्तुंचे दर बाजारभावापेक्षा कमी दाखवले जातात. एकूण ७० लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सगळे बसवायचे असल्यामुळे असे बहुसंख्य उमेदवारांकडून केले जात असते. त्यामुळे आयोगाने प्रचार व कार्यकर्त्यांसाठी लागणाºया अनेक नानाविध वस्तुंचा बारकाईने विचार करून एक दर सुचीच जाहीर केली आहे. फक्त प्रचारसभेच्या खर्चातच एकूण ४२ प्रकारच्या खर्चाचा विचार आयोगाने केला आहे. त्यात मांडवापासून ते हारतुऱ्यांपर्यंत व पाण्याच्या बाटलीपासून ते कार्यकर्त्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या खाण्याच्या भत्त्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. मंडप, त्यावरचे लाईट, साधे व एलईडी, पंखे, टेबल व सिलिंग, गादी, उशी, अशा अनेक गोष्टींचे नगनिहाय दर या सुचीत देण्यात आले आहेत. त्यातच वडापाव १२ रुपये , पुरीभाजी २५ रुपये, बिसलेरी बाटली १२ चा संच १२० रुपए, २० लिटरचा जार ३५ रुपये असे दर आहेत.प्रचार सभेनंतर फेटे (प्रति नग १५० रुपये), गांधी टोपी (प्रति नग १५ रुपये), पुणेरी पगडी (प्रति नग ३५० रुपये) यांचा खर्च दिला आहे. प्रचार कार्यालयातील टेबल, खुर्च्या, गादी, उशी यांचे भाडे प्रतिदिन प्रतिनग असे नमुद करण्यात आले आहे. स्टेशनरी मध्ये साध्या टाचणीपासून स्टेपलरपर्यंत सगळ्यांचा विचार करण्यात आला आहे. पोस्टर, बॅनर या प्रचार साहित्याचीही दरसुची देण्यात आली आहे. उमेदवाराने त्याच्या दैनंदिन खर्चात या गोष्टी असल्यास जिल्हा दरसुचीत असलेलेच दर नमुद करायचे आहेत. त्यापेक्षा कमी दर असले तर ते मान्य होणार नाहीत, त्याची चौकशी करण्यात येईल असेही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा दर सुची देताना सांगण्यात आले आहे. यातील काही दरांवर काँग्रेसने हरकत घेतली आहे. सभेसाठी लागणाºया प्लॅस्टिक खुर्च्या बाजारभावाप्रमाणे फक्त १० रुपए भाडेतत्त्वावर उपलब्ध होत असताना आयोगाच्या दरसुचीत प्रत्येक खुचीर्चा दर २८ रुपये नमुद करण्यात आला आहे. तो कमी करण्यात यावा, तसेच अन्य काही वस्तूंचे दर बाजारभावापेक्षा बरेच जास्त असल्यामुळे त्याचाही विचार करावा असे काँग्रेसने आयोगाला कळवले असून येथील निवडणूक कार्यालयातही हरकत नोंदवली आहे.
टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगfoodअन्न