डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस रविवारी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:32 IST2018-02-03T03:32:31+5:302018-02-03T03:32:51+5:30

मुंबईत परेल आणि करी रोड येथे पादचारी पुलाच्या कामासाठी दि. ४ फेब्रुवारी रोजी सर्व चार मार्गांवर मध्य रेल्वेच्या वतीने पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

 Deccan Queen, Pragati Express canceled on Sunday | डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस रविवारी रद्द

डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस रविवारी रद्द

पुणे : मुंबईत परेल आणि करी रोड येथे पादचारी पुलाच्या कामासाठी दि. ४ फेब्रुवारी रोजी सर्व चार मार्गांवर मध्य रेल्वेच्या वतीने पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड यांसह अन्य काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे.
रविवारी सकाळी ८.३० ते ४.३० या कालावधीत अप आणि डाऊन अशा चारही रेल्वेमार्गांवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई लोकलसह अनेक काही एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. या काळात सर्व लोकल छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसऐवजी दादर किंवा कुर्ला स्थानकातून सोडण्यात येतील. हार्बर लाइनवर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

Web Title:  Deccan Queen, Pragati Express canceled on Sunday