शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

मुंबई- पुणेकरांची 'फेव्हरेट' असलेली 'डेक्कन क्वीन' सहा महिन्यानंतर ट्रॅकवर धावली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 12:13 IST

डेक्कन क्वीन ही पुणे व मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत आवडती गाडी आहे. 

ठळक मुद्देपहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी; २५० च्या जवळपास आरक्षण

पुणे : रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेली डेक्कन क्वीन शनिवारी पुणेरेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना झाली. ही गाडी मुंबईतून शुक्रवारी पुण्यात दाखल झाली. लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यांपासून ही गाडी यार्डातच होती. दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प असून केवळ २५० च्या जवळपास आरक्षण करण्यात आले होते. 

डेक्कन क्वीन ही पुणे व मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत आवडती गाडी आहे. 

लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांनी ही गाडी धावणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेकडून इंद्रायणी एक्सप्रेसही सोडण्यात येणार आहे. डेक्कन क्वीन शुक्रवारी रात्री पुणे स्थानकात दाखल झाली. ही गाडी शनिवारी सकाळी नियमित वेळेत मुंंबईकडे रवाना झाली. तत्पुर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप, रेल्वे अधिकारी व प्रवाशांकडून गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने मुंबईतून आलेल्या डेक्कन क्वीनला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. केवळ १८७ प्रवाशांनी आरक्षण केले होते. तसेच शनिवारी मुंबईला जाणाऱ्या गाडीलाही फारसा प्रतिसाद नाही. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास २०० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. पुण्यातून सायंकाळी मुंबईला गेलेल्या इंद्रायणी एक्सप्रेसलाही केवळ २४० प्रवाशांनीच आरक्षण केले होते. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी क्षमता प्रत्येकी १४५० एवढी आहे. -----------------पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी असु शकतो. पण पुढील काही दिवसात प्रवाशांचा प्रतिसाद वाढत जाईल, याची खात्री आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग-----------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याpassengerप्रवासीMumbaiमुंबई