Deccan Queen Express: मुंबईत ७२ तासांचा ब्लॉक; 'हे' चार दिवस डेक्कन क्वीन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:03 IST2022-02-03T15:45:01+5:302022-02-03T16:03:49+5:30
मुंबईला येणाऱ्या जवळपास ५० गाड्या रद्द केले असून यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या डेक्क्न, डेक्कन क्वीन एक्सप्रेस चार दिवसांठी करिता रद्द करण्यात आली आहे

Deccan Queen Express: मुंबईत ७२ तासांचा ब्लॉक; 'हे' चार दिवस डेक्कन क्वीन रद्द
पुणे : मुंबई विभागात ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान ५ व सहाव्या मार्गिकेचे काम केले जाईल. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या जवळपास ५० गाड्या रद्द केले असून यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या डेक्क्न, डेक्कन क्वीन एक्सप्रेस चार दिवसांठी करिता रद्द करण्यात आली आहे. तसेच पुण्याहून धावणारी कोयना एक्सप्रेस देखील रद्द झाली आहे.
४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द झाली तर ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस धावणार नाही. तर ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द झाली आहे. यासह ४ व ५ फेब्रुवारी रोजी हेंद्राबाद -मुंबई एक्सप्रेस ही पुण्यापर्यंतच धावेल तर हुसेनसागर एक्सप्रेस देखील पुण्यापर्यंतच धावणार आहे.