शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अर्थिक परिस्थिती ओढाताणीची असल्याने कर्जमाफी देता येणार नाही; अजित पवारांनी केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 21:29 IST

शेतकरी कायम दुष्टचक्रात सापडत आहे. कधी कमी पाऊस तर कधी अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

इंदापूर (कळस): दोन लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, अशी घोषणा मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे त्याची ना अंमलबजावणी झाली ना अध्यादेश निघाला ही केवळ घोषणाच राहीली या वर्षीच्या अर्थसंकल्पाला सामोरे जाताना याबाबत भाष्य करताना अर्थिक परिस्थिती ओढाताणीची असल्याने कर्जमाफी देता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 

इंदापुर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार यशवंत माने उपस्थित होते.पवार यांनी म्हणाले, राज्यशासनाचा अर्थसंकल्प हा साडेचार लाख कोटी असतो मात्र मार्च पर्यंत साडेतीन लाख कोटी मिळतील. त्यामधील दीड लाख कोटी पगार पेन्शन साठी जातात. राहिलेल्या रक्कमेतुन सर्व विभागांना न्याय द्यावा लागतो. त्यामुळे अडचणी आहेत असे सांगितले.

राज्यशासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम देण्यात आली, व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान, तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम असणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी अशी घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.मात्र त्याची ना अंमलबजावणी झाली ना अध्यादेश निघाला. ही केवळ घोषणाच राहिली.  मात्र, नवीन अर्थसंकल्प सादर करण्यास काही दिवस राहिले असताना कोरोना संकटामुळे कर्जमाफी होणार नसल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. 

शेतकरी कायम दुष्टचक्रात सापडत आहे. कधी कमी पाऊस तर कधी अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर २०१९पर्यंत दोन लाख रुपये थकीत कर्ज असलेल्या अशा शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी झाली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी