वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:45 IST2017-12-20T15:41:32+5:302017-12-20T15:45:12+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे.

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत अपघात
लोणी काळभोर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून संबंधिताच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमुळे तरुणाची ओळख पटली आहे.
या अपघातात बालाजी शिवाजी शिंदे (वय ३५, रा. रामतीर्थ, ता. निलंगा, जि. लातूर) हे मृत्यूमुखी पडले आहेत. याप्रकरणी कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद मच्छिंद्र कुंजीर (वय ३९, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरिक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (बुधवार, दि. २०) पहाटे घडला आहे. यातील मृत बालाजी शिंदे हे कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हॉटेल श्रीनाथ समोरून पायी चालत जात असताना त्यांना अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने त्यांच्या कंबरेखालच्या भागावरून चाक गेले. यात ते जागीच मृत्यूमुखी पडले. आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सर्व्हिस रोडच्या उत्तरेस पडलेला आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटील मिलिंद कुंजीर यांना ही बाब ८ वाजण्याच्या सुमारास समजली, ते लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहचल्यानंतर मृत व्यक्तीच्या खिशात वाहन चालवण्याचा परवाना व काही कागदपत्र मिळाली. त्यामध्ये असलेल्या एका मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर त्यांची ओळख पटली.