शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेने युवतीचा मृत्यू

By admin | Updated: August 8, 2015 00:52 IST

कात्रज - कोंढवा रस्त्यावर दुधाच्या टँकरने धडक दिल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले. दुधाच्या भरधाव टँकरमुळे एक दुचाकी (एमएच १२-केडी १३७१) रस्त्याच्या

आंबेगाव बुद्रुक : कात्रज - कोंढवा रस्त्यावर दुधाच्या टँकरने धडक दिल्याने एका युवतीला आपले प्राण गमवावे लागले. दुधाच्या भरधाव टँकरमुळे एक दुचाकी (एमएच १२-केडी १३७१) रस्त्याच्या कडेला घसरली. यात दुचाकीवरील युवक सुनील जावळकर (वय २०, हडपसर) हा रस्त्याच्या बाजूला पडला, तर युवती दूध टँकरच्या (एमएच १०-एडब्ल्यू ७२१२) चाकाखाली आली. या दुर्घटनेत आसावरी अनिल पाटील (वय २०) हिचा दुर्दैवी अंत झाला. या वेळी शिवगोरक्ष पटांगणात असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचून जखमींना खासगी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी टँकरचालक रवींद्र कलाप्पा नागराळे (वय ३५, रा. आंबेगाव खुर्द) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या अपघातामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर अधिकच कोंडी झाली होती. तब्बल दीड तास या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व भारती विद्यापीठ विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. युवतीचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोखून ठेवला. मात्र, पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेने या प्रकरणी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. (वार्ताहर)