कालव्यात बुडून नेरेतील तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:45 IST2018-12-25T00:45:10+5:302018-12-25T00:45:19+5:30
धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेली नेरे येथील तरुणी अश्विनी प्रल्हाद पवार (वय २१) ही पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.

कालव्यात बुडून नेरेतील तरुणीचा मृत्यू
नेरे : धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेली नेरे येथील तरुणी अश्विनी प्रल्हाद पवार (वय २१) ही पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.
नेरे (ता. भोर) गावाशेजारून धोम-बलकवडी धरणाचा डावा कालवा गेला आहे. त्याचे पहिले आवर्तन गेले ८ दिवसांपूर्वी सुटले आहे. या कालव्याशेजारील मोकळ्या जागेत अश्विनी पवार ही तरुणी कपडे धुण्यासाठी गेली होती. पाणी उपसण्यासाठी ती गेली असता पाय घसरून पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या वेळी अश्विनीला जवळच शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांनी व ग्रामस्थांनी पराकाष्ठा करून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मृत्यू झाला होता.