अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:26 IST2018-11-21T11:26:27+5:302018-11-21T11:26:39+5:30

पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Death of woman in firing by unknown youth | अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

चंदननगर: पुण्यात महिलेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील आनंद पार्क चौकातील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी वय 34 या महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात महिलेचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. सकाळी आठ वाजून 15 मिनिटांनी दोन तरुण त्या महिलेच्या घरातील दरवाजावर आले आणि त्यांनी महिलेवर गोळ्या झाडल्या.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन किंवा स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटी सोसायटीतील ज्ञानदीप या इमारतीत घुसले, यानंतर यानंतर एकता ब्रिजेश भाटी व व त्या त्यांचे पती घरात बसलेले होते. यानंतर 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला, त्यानंतर दोन्ही तरुणांनी दरवाजा उघडताच महिलेच्या छाताडावर गोळ्या झाडल्या आणि त्यांनी पोबारा केला. याबाबत चंदननगर पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून कशातून हा प्रकार घडला आहे,  याचा तपास करीत आहेत.

Web Title: Death of woman in firing by unknown youth