आंबेठाण : वाकी ता. खेड गावच्या परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर जे. के. हॉटेलसमोर शुकक्रवारी (दि. १८ मे) रोजी अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. याप्रकरणी संतोष दगडू लोणारी (वय - २५, रा. भोसे, ता. खेड) या रुग्णवाहिका चालकाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, त्याचे मृत व्यक्तीचे वय अंदाजे पंचवीस ते सत्तावीस वर्ष आहे. उंची पाच फुट, रंग सावळा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार सतीश जाधव, अनिल ढेकणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:28 IST
अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्दे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल