निरा नदीत बुडून ज्येष्ठाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:52 IST2018-09-18T16:49:49+5:302018-09-18T16:52:06+5:30
नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरल्याने खड्ड्यात पडून मृत्यु झाला.

निरा नदीत बुडून ज्येष्ठाचा मृत्यू
सांगवी : नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरल्याने खड्ड्यात पडून मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.वामन गेनबा लोंढे (वय ६५) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पांडूरंग चव्हाण यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. सोमवारी सकाळी लोंढे हे नीरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. दरम्यान नदीत मोठमोठ्या खड्डयांचा त्यांना अंदाज न आल्याने शेवाळावरून ते पाय घसरुन पडले. पाण्यात पडलेल्या लोंढे यांचा पाय माशाच्या जाळ्यात अडकला. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
यावेळी नीरा नदीच्या पुलावरून नागरिकांना सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा सदरा पाण्यावर तरंगताना दिसला. सांगवी येथील राजेंद्र जगताप, व इतर तरुणांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. माळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याबाबत पोलीस हवालदार आबा ताकवणे हे अधिक तपास करत आहेत.