विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:59 IST2018-06-15T20:59:11+5:302018-06-15T20:59:22+5:30
सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळील महावितरणच्या इलेक्टॉनिक्स डी.पी. बॉक्सचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
पुणे : सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळील महावितरणच्या इलेक्टॉनिक्स डी.पी. बॉक्सचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. बापु मेसा कांबळे (वय ४०, रा. पर्वती) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापु कांबळे हे जनता वसाहत परिसरात राहण्यास होते. त्यांना दारूचे व्यसन होते. दरम्यान सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पीटलजवळ रस्त्याच्या कडेला महावितरणचा इलेक्ट्रॉनिक्स डी.पी. बॉक्स आहे. तो उघडा असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बापु कांबळे यांच्या उजवा हाताला शॉक लागून त्यांचा जागिच मृत्यू झाला. उजवा हात पुर्णपणे भाजला होता. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार, दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिसांनी स्वारगेट उप-विभागीय कार्यालयाला इलेक्ट्रॉनिक्स डीपीची तपासणीकरून अहवाल पाठविण्याचे पत्र पाठविल्याचे सांगितले आहे.