शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर ‘मृत्यू’चे पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 02:38 IST

महामार्ग प्रशासन, पोलिसांकडून दुर्लक्ष; महामार्गावर उभी राहताहेत धोकादायकरीत्या अवजड वाहने

भिगवण : भिगवण येथे पुणे-सोलापूर महामार्गावरच अनधिकृतरीत्या वाहने पार्किंग केली जात आहे. आतापर्यंत अनेक गंभीर अपघात घडून हकनाक जीव गेले आहेत. मात्र महामार्ग प्रशासन, महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासन लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. तर रस्ते सुरक्षेसाठी नेमलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी कामात कसूर करीत असल्याने अपघातांची संख्या वाढीस लागली असल्याचे दिसून येते.पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे हायवेवर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सर्व्हिस रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे फळे, व्यावसायिक तसेच भिगवण बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक पुण्याकडून सोलापूरकडे जाणाºया बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग करीत असल्याने आतापर्यंत दोन-चार गंभीर अपघातही घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. याकडे रस्ते सुरक्षेसाठी नेमलेले महाराष्ट्र सुरक्षा बल, टोल प्रशासन आणि वाहतूक पोलीस कोणतीही कडक भूमिका घेत नसल्याने वाहने पार्किंग करणाºयांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. हायवेवर वाहने पार्किंग करू नये. या नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्याने काही व्यावसायिकांनी पार्किंगसाठी जागाच आरक्षित केल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरच गाड्या दुरुस्ती केली जात असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे यावर टोल प्रशासन तसेच महामार्ग पोलीस यांनी तातडीने कारवाई करून या अवैध पार्किंग करणाºयांविरोधात शासन करण्याची गरज असल्याचे सामाजिक संघटना मत व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAccidentअपघातPuneपुणेSolapurसोलापूर