शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नीरा येथील ज्युबिलंट कंपनीच्या विषारी वायू गळती दुर्घटनेमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 19:56 IST

बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा - निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये १७ एप्रिल २०१९ रोजी  वायू गळतीची  घटना घडली होती.

ठळक मुद्देवायू गळतीत ४८ कामगार बाधित वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

नीरा : बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा - निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये १७ एप्रिल २०१९ रोजी  वायू गळतीची  घटना घडली होती. त्यात ४८ कामगार बाधित झाले होते. त्यामध्ये अत्यवस्थ असलेल्या संजय जगन्नाथ ढवळे या अधिका-याचा मंगळवारी (दि.७)  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना नीरा व परिसरात वा-यासारखी पसरल्यामुळे नागरिकांमध्य भयावह वातावरण पसरले आहे.   नीरा नदीच्या काठावरील निंबुत - नीरा येथील घातक रसायन उत्पादन करणाऱ्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल २०१९  रोजी अ‍ॅसीटिक अनहायड्राईड या टाकीतून विषारी वायू गळतीमुळे लोकांना डोळ्यात व फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात वेदना झाल्याने सुमारे ४८ कामगार बाधित झाले होते. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या काही कामगारांना पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी संजय जगन्नाथ ढवळे (वय- ५६) या अत्यवस्थ अधिका-याचा मंगळवारी (दि.७)  रात्री बारा  वाजण्याच्या सुमारास  पुणे येथील केईएम रूग्णालयात  उपचारा दरम्यान मुर्त्यु  झाला. ढवळे हे ज्युबिलंट कंपनीत लाजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत होते. हल्ली ते ज्युबिलंट कंपनीच्या कॉलनीमध्ये राहत होते. ढवळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून त्यापैकी एक विवाहित मुलगी, दोन भाऊ आहेत. लोणंद (ता. खंडाळा) या ढवळे यांच्या मूळ गावी त्यांच्यावर बुधवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान , ज्युबिलंट कंपनीमध्ये  वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने  कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले असून कंपनीने उत्पादन चालू ठेवले आहे कि नाही हे समजू शकले नाही. तसेच ज्युबिलंट कंपनीच्या दुर्घटनेमुळे अजूनही कंपनी परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण  आहे. घातक रसायने निर्माण करणा-या ज्युबिलंट कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. या आंदोलकांनी मागील दोन दिवसांपासून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आंदोलकांचा न्यायालीन लढा सुरू असुन पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे......      मानवी जीवास घातक रसायने भर लोकवस्तीत निर्माण केली जात आहेत.  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता फॅक्टरी इन्स्पेक्टर यांचा अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा प्लैंट आजही सुरू असल्याने संताप व्यक्त करुन निषेध व्यक्त करत आहोत. हे युनिट त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.- सचिन मोरे , नीरा नदी संघर्ष समिती, अध्यक्ष

 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू