शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:49 IST

पुणे स्टेशन, लोणी काळभोर, कोंढवा भागात १०० ते १५० किलो गांजा पकडून देण्यात लिओची महत्वाची भूमिका

पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेत मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि गेल्या आठ वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेला लाडका श्वान ‘लिओ’चा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अंमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शोकाकुल वातावरणात सलामी गार्डने लिओला अखेरची मानवंदना दिली.

लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला. तो चार महिन्यांचा असताना, सप्टेंबर २०१६ मध्ये पुणे पोलिस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून (हँडलर) खडतर प्रशिक्षण देण्यात आले. श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अंमली पदार्थ हुडकणे, तसेच कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा समावेश गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात करण्यात आला होता. विविध शाळा, तसेच लष्कराच्या कार्यक्रमात लिओ सहभागी व्हायचा.

आठ वर्षांतील कामगिरी 

- गेल्या आठ वर्षांपासून लिओ गुन्हे शाखेत कार्यरत होता. सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोरमधील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. या शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता.- एका नायजेरियन तस्कराकडून गांजा, तसेच मेफेड्रोनचा साठा पकडून देण्यात लिओची दमदार कामगिरी हाेती. २०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओची महत्त्वाची भूमिका होती.- पुणे रेल्वे स्थानक, तसेच बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘लिओ’ला नेण्यात यायचे. अन्य श्वानाच्या तुलनेत लिओची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना झाला होता.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdogकुत्राDeathमृत्यू