शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 15:34 IST

भिगवण रेल्वे स्टेशन येथील महिला रुग्णावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार

ठळक मुद्देकोरोना बाधिताच्या मृत्यूने भिगवणकर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण रेल्वे स्टेशन येथे कोरोनाची लागण झालेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी याबाबतमाहिती दिली.या महिलेच्या रुपाने इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.कोरोना बाधिताच्या मृत्यूने भिगवणकर नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भिगवण रेल्वे स्टेशन येथील महिला रुग्णावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.गुरुवारी (दि ३०) सकाळी त्यांचे  निधन झाले आहे. या कोरोणाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील १८ जणांचा कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्याची माहिती मिळतअसतानाच हि धक्कादायक बातमी समजली आहे. या बातमीमुळे येथील नागरिक काळजीत पडल्याचे चित्र आहे. भिगवण येथील खासगी हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि पॅथोलॉजी चालक तसेच हॉस्पिटल काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासह रुग्णाच्या कुटंंबातील ४ जणांचा हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये समावेश होता.

बारामती येथील शासकीय दवाखान्यात १४ जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी सायंकाळी मिळाले आहे.तर पेशंटच्याघरातील ४ सदस्यांना ओंध पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते.त्यांचा तपासणी अहवाल गुरुवारी सकाळी मिळाला आहे. तो अहवाल निगेटिव्ह आल्याने भिगवण करांना दिलासा मिळाल्याचे मानले जात होते.मात्र,या रुग्णाच्या मृत्युने दिलासा काळजीत बदलल्याचे चित्र आहे. दरम्यान तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटीव्ह आलेल्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.अमित उदावंत यांनी दिली आहे.मात्र तरीही भिगवण आणि परिसर सील करण्यात आला आहे. कोणीही अत्यंत महत्वाचे काम असल्या शिवाय घरातून बाहेर पडू नये ,असा इशारा प्रभारी पोलीस निरीक्षक जे . एच .माने यांनी दिला आहे .

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूWomenमहिला