शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांसमोर विषारी औषध प्राशन केलेल्या गुळाणी येथील शेतकऱ्याचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:14 IST

शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्याने तहसीलदार दालनात विषारी औषध प्राशन केले होते.

राजगुरूनगर:  तहसीलदारांसमोर औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे गुळाणी ( ता. खेड ) येथील शेतकरी भगवान विठ्ठल गुळाणकर (वय ५५ ) यांचा उपचारादरम्यान शनिवारी(दि २१) मृत्यू झाला अशी माहिती गुळाणीचे माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी दिली.गुळाणी गावठाण परिसरात असलेल्या आपल्या वहिवाट जागेवर गावातील अ‍ॅड. ज्ञानेश्वर रोडे,त्यांचे वडील व भाऊ यांनी मिळून अतिक्रमण केल्याचा आरोप मयत गुळाणकर यांनी केला होता. त्याविरोधात गेली आठ महिने विविध कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले होते. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्याने सोमवारी (दि१६) खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या दालनात विषारी औषध प्राशन केले होते.या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.तहसीलदार आमले यांच्या वतीने शेतकऱ्याविरोधात आत्महत्या प्रयत्न करून न्यायासाठी प्रशासनावर दबाव आणला म्हणून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.तर शेतकरी गुळाणकर यांच्या बाजूने त्यांचे बंधु सहादू विठ्ठल गुळाणकर यांनी अतिक्रमण करणारे विरोधक तसेच न्याय मागायला गेल्यावर दमबाजी, शिवीगाळ केल्यावरून पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी व गावातील इतर दोन इसम यांच्या विरोधात विभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे यांच्याकडे तक्रार दिली आहे. आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या शेतकरी भगवान गुळाणकर यांनी औषध घेतल्यावर त्यांना राजगुरूनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे गुरुवारी सकाळी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी दिली.

टॅग्स :KhedखेडDeathमृत्यूFarmerशेतकरीPoliceपोलिस