शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण झालेल्या सासऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; फरार जावयावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:59 IST

मुलींचा चांगला सांभाळ कर असे सांगणाऱ्या सासऱ्यावर  जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देराजेंद्र दादाराव शिंदे (वय ३५) या फरार आरोपींचा हडपसर पोलीस घेत आहेत शोधआरोपी शिंदे हा फिर्यादी जाधव यांच्या मुलीचा करत नव्हता सांभाळ, त्याला होते दारूचे व्यसन

हडपसर : मुलींचा चांगला सांभाळ कर असे सांगणाऱ्या सासऱ्यावर जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना २९ डिसेंबरला सायंकाळी नऊच्या सुमारास वैदवाडी येथे घडली होती. काल (दि. १८) मृत विठ्ठल आबाजी जाधव (वय  ६०) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या प्रकरणी राजेंद्र दादाराव शिंदे (वय ३५) या फरार आरोपींचा शोध हडपसर पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पार्वती उत्तम जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी जाधव व आरोपी शिंदे वैदुवाडी गोसावी वस्ती परिसरात जवळच राहतात. आरोपी शिंदे हा फिर्यादी जाधव यांच्या मुलीचा सांभाळ करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. सांभाळ करण्यासाठी समजून सांगण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावर जावई शिंदे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सासरे गंभीर जखमी झाले. या वेळी सासूलाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान सासरे जाधव यांचे निधन झाले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी राजेंद्र शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :hadapsar policeहडपसर पोलीसPuneपुणे