कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:15 IST2018-01-16T14:10:49+5:302018-01-16T14:15:22+5:30

कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

The death of the college student fell down from the fourth floor of the High Society, Kondhva, Pune | कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देआशिष हा गॅलरीत उभा होता, अचानक पडला़ खाली आत्महत्या आहे की, खाली पडल्याने मृत्यू झाला़ याबाबत कोंढवा पोलीस करीत आहेत़ तपास

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली़ उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला़ आशिष विलास कामटे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे.
कोंढवा पोलिसांनी सांगितले, की आशिष हा बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे़ मकर संक्रातीनिमित्त त्याची विवाहित बहीण घरी आली होती़ तिला सासरी सोडवायचे होते़ आशिषने तिला सोडवावे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले़ रात्री साडेआठ वाजता आशिषचे वडिल हे जेवण करीत होते़ त्यावेळी आशिष हा गॅलरीत उभा होता़ अचानक तो खाली पडला़ त्याच्या डोक्याला मार लागला़ त्याला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते़ उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यु झाला़ 
आशिष हा गॅलरीतून सरळ खाली पडला़ त्याने उडी मारली असती तर तो थोड्या लांब अंतरावर पडला असता़ त्यामुळे ही आत्महत्या आहे की, खाली पडल्याने मृत्यू झाला़ याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़ 

Web Title: The death of the college student fell down from the fourth floor of the High Society, Kondhva, Pune