पिंपरी : घरात खेळता खेळता इलास्टिक दोरीचा मुलाला गळफास लागुन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. नकुल कुलकर्णी (वय-८) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अवघ्या काही दिवसांवर त्याच्या मुंजीचा कार्यक्रम सोहळा होणार होता.या घटनेचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घरात खेळता खेळता नकुल या आठ वर्षाच्या मुलाला गळफास लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आजी आजोबा बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते तर नकुलची काही दिवसांनी मुंज असल्यामुळे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर गेले होते. नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलेस्टिक दोरीसोबत खेळताना त्याला गळफास लागला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबियांनी त्याला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने अखेर दाराचे कुलूप तोडले तेव्हा गळफास लागलेल्या अवस्थेत नकुल आढळून आला.
निगडीत इलास्टिक दोरीचा गळफास लागून ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 20:36 IST
घरात खेळता खेळता इलास्टिक दोरीचा गळफास लागुन आठ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
निगडीत इलास्टिक दोरीचा गळफास लागून ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
ठळक मुद्देकाही दिवसांनी मुंज असल्यामुळे आमंत्रण देण्यासाठी आई वडील घराबाहेर