शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

धक्कादायक! लष्कराच्या 4 जवानांचा मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:03 IST

वरिष्ठांकडे तक्रार करुनही कारवाई नाही

पुणे: लष्कराच्या 4 जवानांविरोधात पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मूकबधीर महिलेवर 4 वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला खडकीतील लष्करी रुग्णालयात काम करते. आरोपींनी याच रुग्णालयात तिच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. खडकीतील लष्करी न्यायालयानं चारही आरोपींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पीडित महिला मूकबधीर असल्याचा गैरफायदा घेत जवानांनी तिच्यावर 4 वर्षे अत्याचार केले. यानंतर जुलैमध्ये तिनं इंदूरमधील एका एनजीओशी संपर्क साधला. एनजीओमधील तज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या मदतीनं पीडितेनं आपला जबाब नोंदवला. ज्ञानेंद्र महिलेच्या सोबत पुण्याला आले आणि त्यांनी चारही जवानांविरोधात तक्रार दाखल केली. 'जुलै 2014 मध्ये मी लष्कराच्या रुग्णालयात सेवा बजावत होते. त्यावेळी माझी नाईट शिफ्ट होती. त्यावेळी एका जवानानं वॉर्डच्या स्वच्छतागृहात नेऊन माझ्यावर बलात्कार केला. याप्रकरणाची तक्रार मी वरिष्ठांकडे केली. त्यांनी मला कारवाईचं आश्वासन दिलं. याबद्दल माझी बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावलं. मात्र त्यांनीही माझ्यावर बलात्कार केला,' असा जबाब महिलेनं नोंदवला आहे. यानंतर या दोघांनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप महिलेनं केला. आमच्यासोबत शारीरिक संबंध न ठेवल्यास तुझा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी दोघांनी पीडितेला दिली. यानंतर दोन्ही आरोपी आणखी दोन जवानांसोबत महिलेवर बलात्कार करायचे. हा धक्कादायक प्रकार चार वर्षे सुरू होता. महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोन जवानांनी तिचा व्हिडीओ चित्रीत केला होता. हाच व्हिडीओ दाखवून जवान तिला ब्लॅकमेल करायचे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करुनही काहीच कारवाई झाली नाही, असंदेखील पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवानPuneपुणे