शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मुळा-मुठा नदी पात्रात मृत माशांचा खच; नायडू मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी प्रक्रियेविना नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:20 IST

महापालिका किंवा राज्य शासनाकडून पर्यावरण कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यंत्रणा नाही

लष्कर : पुण्यातील महत्त्वाच्या मुळा-मुठा नदी पात्रात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील नाईक बेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला. नायडू मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी आणि नदी सुधारणेच्या नावाखाली नदीचा कमी झालेले पात्र याला जबाबदार असल्याची माहिती कांची वस्तीतील नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.

मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मृत जलचर प्राणी आणि माशांच्या खच साचला आहे. पाण्याच्या प्रदुषणासह पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर कारणे समोर आली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून पर्यावरणाचा रक्षण करण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार अतिशय उदासीन असल्याचे दिसत आहे.मैला पाणी थेट नदीत महापालिकेने नायडू रुग्णालयाजवळ मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प पंपिंग स्टेशन सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी उभारला आहे. मात्र, या पाण्यावर प्रक्रिया न करता पाणी थेट नाल्यामार्फत मुळा-मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे नदीतील जलचरांसह माशांचा मृत्यू होत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे रविवारी पाण्यावर मोठ्या प्रमाणात साचलेले मृत माशांचा खच हा होय.

नदी सुधारणा प्रकल्प सदोष

केंद्र शासनाचा नदी सुधारणा प्रकल्पाच्या नावावर मुळा-मुठा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणत कमी झाले आहे. सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली नदीचे दोन्ही बाजूचे पात्र हे अरुंद झाले आहे. नदी खोलवर खोदली नसल्याने मोठ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नदीला पूर येऊन हे पाणी नागरिकांच्या घरात शिरते.

प्रशासनाचे सततचे दुर्लक्ष 

पुण्याचे नैसर्गिक सौंदर्य कथाकथित प्रगतीच्या नावावर कमी होत चालले आहे. महापालिका किंवा राज्य शासनाकडून पर्यावरण कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यंत्रणा नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

महापालिकेच्या नायडू पंपिंग स्टेशनचे दूषित पाणी प्रक्रिया न करता मुळा-मुठा नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. राज्य शासन किंवा महापालिकेचे याकडे लक्ष नाही. पावसाळ्यात देखील पुराचे पाणी आमच्या घरात येते. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. - शैलेश कांची, स्थानिक नागरिक

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणmula muthaमुळा मुठाriverनदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरण