शहरं
Join us  
Trending Stories
1
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
2
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
4
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
5
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
6
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
7
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
8
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
9
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
10
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
11
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
12
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
13
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
14
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
15
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
16
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
17
दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड
18
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
19
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:49 IST

घटनास्थळी तातडीने पोलीस फाटा दाखल झाला असून गुन्हे शाखेचे पथक आणि पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी केली आहे

धनकवडी : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागा नगर चौकात भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजता घडली. दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर गोळीबार केला. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला असून समीर मनूर शेख, (वय २८ वर्षे, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, समीरला नुकतेच बारामती मतदारसंघ काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून पद मिळाले होते. याशिवाय तो बांधकाम व्यावसायिक म्हणून सुद्धा काम करत होता. समीरच्य घरी आई वडील, पत्नी आणि सहा महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकातून दत्तनगर कडे जाणाऱ्या गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या घटनेने कात्रज आणि धनकवडी परिसरात खळबळ उडाली. घरातून बुलेट वर बाहेर पडलेला समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला होता. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर बेछूटपणे तब्बल सहा गोळ्या झाडल्या. डोक्यावर झालेल्या या गोळीबारात समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती

समीर मनूर यांची काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मनूर यांच्या खुनामागे आर्थिक देवघेव असल्याचे कारण स्पष्ट होत असून या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेहबुब भळुरगी असे ताब्यात घेतलेल्या व्यक्ती चे नाव आहे. तो समीर चा मित्र होता.

टॅग्स :DhankawadiधनकवडीfireआगPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू