शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहराला दिवसाआड पाणी, तेही दूषित

By admin | Updated: June 8, 2015 04:54 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या दोनपैकी एका इंटेकवेलला पाणी कमी पडत असल्याने एक मोटार बंद आह.

भोर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणात पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या दोनपैकी एका इंटेकवेलला पाणी कमी पडत असल्याने एक मोटार बंद आह. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे, त्यातच तर एक फिल्टर प्लांट बंद असल्याने निम्म्या शहराला दूषित पाणी प्यावे लागत आहे. भाटघर धरणाच्या खाली १९७४ साली विहीर काढून पहिली नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली. तर १९९० साली नवीन इंजिनघर बांधण्यात आले. भाटघर ते शंकरहिलदरम्यान ७ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ९० एचपीचे २ व ५० एचपीचे २ असे चार पंप असून त्यापैकी दोन पंपांनी पाणीपुरवठा सुरूआहे. दररोज साधारणपणे २० लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र धरणात सध्या फक्त १.७० टक्के अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एका इंटेकवेलला पाणी पुरत नाही. परिणामी पाणी विहिरीत जात नसल्याने एक पंप बंद आहे. त्यातच दोनपैकी एकच फिल्टर प्लांट सुरु असल्याने निम्म्या भोर शहराला दूषित पाणी प्यावे लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.दुसऱ्या इंटेकवेलला पाणी पुरावे म्हणून धरणाच्या वॉलमधून सोडलेले पाणी बांध घालून चारी काढून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अडवले आहे. मात्र तरीही पाणी येत नाही. त्यासाठी नदीपात्रात जे.सी.बी. लावून चारी काढली तरच पाणी पुरणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी पडले की ही परिस्थती निर्माण होते. पुन्हा धरणे भरुन पाणी सोडेपर्यंत साधारणपणे मे ते आॅगस्ट महिन्यापर्यंत अशीच अवस्था असते. यावर भोर नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यातच नगरपालिकेकडे कायमस्वरुपी कर्मचारी कमी असल्याने ७ ते ८ जणांना तातपुरत्या स्वरुपात कर्मचारी घेतले आहेत. मात्र निधीअभावी अनेकदा सदरच्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते. भाटघर धरणात अत्यंत कमी पाणीसाठा असल्याने धरणातील पाणी सोडणे बंद केल्याने धरणाचे पावर हाऊसही बंद झाले आहे. धरणाच्या मेनगेटवॉलमधून पाणी सोडण्याची मागणी केल्यावर पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. मात्र धरणात पाणीच कमी असल्याने सदरचे पाणी एकाच इंटेकवेलला पुरते. दुसऱ्याला जात नाही. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे.(वार्ताहर)