शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 11:56 IST

वडिलांनी मुलीला खोल पाण्यात बोलावून घेतले, त्यानंतर बाहेर येता न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला

भोर : भोर तालुक्यातील जयतपाड येथे भाटघर धरणाच्या बॅकवॉटरला वर्गमैत्रिणीच्या कुटुंबासोबत आलेल्या मुलगी आणि तिच्या वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३) व शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५ दोघे रा औंध पुणे)  अशी त्यांची नावे आहेत.  याबाबत भूषण वामण फालक( वय ४३ रा.बालेवाडी) पुणे यांनी फिर्याद दिली आहे.

 भोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या धर्माधिकारी तिचे आई - वडील काल १५ ऑगस्टच्या सुटटीमुळे इतर दोन मैत्रीणी व तिचे कुंटुबीयसोबत सिमा फार्म मौजे जयतपाड ता.भोर येथे पर्यटनासाठी आले होते. दरम्यान दुपारी ४.३० वाजता सिमा फार्मच्या पाठीमागे भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असलेला धबधबा व बेबी पुल पाहण्यासाठी गेले होते. त्यांनतर वडील धरण्याच्या किना-या जवळुन न येता पाण्यात उतरले. त्यांची मुलगी ऐश्वर्या हि बेबी पुलाजवळ पाण्यात खेळत होती. तिला तिच्या वडीलांनी खोल पाण्यातजवळ बोलावून घेतले. त्यांनतर दोघे पाच ते सहा मिनिट खोल पाण्यात पोहत होते. दोघे पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना बाहेर येता आले नाही. धरणाचे खोल पाण्यात ओढले गेल्याने व थोड्यावेळाने पाण्यात बुडाले. हि महिती सिमा फार्म हाऊस येथील लोकांना कळवल्यानंतर थोड्या वेळाने एका पोहणा-या मुलाने ऐश्वर्याला पाण्याबाहेर काढले. तेव्हा ती बेशुध्द अवस्थेत होती. तिला कारमधून उपजिल्हा रुग्णालय भोर येथे आणले. डॉक्टरांनी ऐश्वर्याला तपासुन तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच शिरीष धर्माधिकारी हे पाण्यात बुडाले होते. राञी उशिरा त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरWaterपाणीDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल