शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय मगर यांचं निधन; आमदार रोहित पवार यांची भावुक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:16 IST

क्रेडाई, नॅशनलचे अध्यक्ष आणि मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे ते वडील होते.

पुणे : हडपसर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर (वय ९१) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. क्रेडाई, नॅशनलचे अध्यक्ष आणि मगरपट्टा सिटी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे ते वडील होत.

पुणे महानगरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ५ जून १९३१ साली जन्मलेल्या आबासाहेब मगर यांचा जन्म झाला. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे मधून १९५६ साली आपली स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी संपादन केली होती.

आबासाहेब मगर हे मगरपट्टा सिटी समूहाचे संस्थापक संचालक, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे संचालक, मराठा शिक्षण प्रसारक मंडळीचे ते आजीव सदस्य होते. कराड अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनेचे ते खंबीर पाठीराखे होते.

आमदार रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट 

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. त्यात सासरे श्री. सतीश (दादा) मगर यांचे वडील आणि मगर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आबासाहेब उर्फ दत्तात्रय धोंडो मगर (आबा) यांचं निधन झालं. हा क्षण आमच्या पवार आणि मगर कुटुंबासाठी अत्यंत दुःखद आणि कठीण आहे. आबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली! असा उल्लेख केेेला आहे.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरDeathमृत्यूRohit Pawarरोहित पवार