दर्श माता पिता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:33+5:302021-02-05T05:07:33+5:30
आदर्श माता पिता पुरस्कार पुणे : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या आईवडिलांचा आदर्श माता पिता ...

दर्श माता पिता पुरस्कार
आदर्श माता पिता पुरस्कार
पुणे : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या आईवडिलांचा आदर्श माता पिता म्हणून सन्मान करण्यात आला .
पुण्यातील सुसंगत फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श माता पिता पुरस्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील एस एम जोशी सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हाधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, तर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत व साहित्यिक ज्योतीराम कदम होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ . सु .भ . न्हाळदे, उद्योजक मल्हारराव इंगळे, सचिव डॉ. संगिता न्हाळदे, ॲन्ड वैशाली वाघमोडे उपस्थित होते .
यावेळी २७ आदर्श कुटुंबीयांचा सुसंगत फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन डॉ. सुनिल धनगर प्रस्ताविक डॉ . सुधाकर न्हाळदे यांनी केले .
फोटो : कुसुमबाई व बबन बारहाते यांना आदर्श माता पिता पुरस्कार देताना जेष्ठ विचारवंत ज्योतीराम कदम, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ . सुधाकर न्हाळदे आदी