पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:21 IST2018-11-14T12:27:32+5:302018-11-14T13:21:54+5:30
पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात बुधवारी सकाळी एका जिमला आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग
पुणे: पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने धुराचे लोण रस्त्यावरुन दिसत आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील हत्ती चौकात हा तलाव असून तिथे तसेच या आगीत एक मोटार देखील भस्मसात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अगोदर तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. आगीचे प्रमाण मोठे असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी थोडा वेळ लागत आहे.