शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धोकादायक! लॉकडाऊनमध्ये दारू सुटली ,पण नशेसाठी औषधी गोळ्यांचा सर्रास वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 11:22 IST

मद्य विक्री बंद असल्याने अनेकांनी आपला मोर्चा औषधी गोळ्यांकडे वळविला..

ठळक मुद्देपोटदुखीच्या गोळ्या घेतल्या जातात सर्रास : साईड इफेक्ट जास्त

विवेक भुसेपुणे : लॉकडाऊनच्या काळात दारु मिळू शकत नसल्याने अनेक जण अस्वस्थ होत होते. त्यातूनच त्यांना पोटात मुरडा आल्यासारखे वाटत होते. त्यावर उपाय म्हणून ते एक गोळी घेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची दारु सुटली पण त्याचवेळी नशेसाठी आता ते अशा गोळ्यांचा वापर करु लागल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. या गोळ्यांचे साईड इफेक्ट खूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून आपल्या घरातील तरुण मुले अशा गोळ्याच्या व्यसनांच्या आहारी गेले नाहीत ना, याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (याचा गैरवापर होऊ नये, म्हणून जाणीवपूवर्क गोळीचे नाव येथे देण्यात आलेले नाही.)

महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीचा त्रास होतो. ही पोटदुखी कमी करण्यासाठी एक गोळी डॉक्टरांकडून दिली जाते. तसेच पोटदुखीसाठी अनेकदा ही गोळी दिली जाते. मात्र, आता त्याचा वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.अनेक तरुण एकावेळी ५ ते ६ गोळ्या घेत असल्याचे दिसून आले आहे.अनेक वस्त्यांमध्ये हे लोण पसरले असल्याचे मेडिकल स्टोअर्समध्ये केलेल्या चौकशीत आढळून आले असून त्यांच्याकडे या गोळ्यांचा खपात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.अनेक तरुण आपल्या येथे येऊन एकावेळी ४ - ५ गोळ्या खावुन त्यावर पाणी पितात. चहा पिताना दिसून येत असल्याचे एका चहा विक्रेत्याने सांगितले.याबाबत एका मेडिकल स्टोअर्स व्रिकेत्याने सांगितले की, या गोळ्या अनेक जण पोट दुखत असल्याचे सांगून घेण्यासाठी येतात़ काही जण आपली बहिण, आईला पाठवितात. ही गोळी कॅटगरीतील नसल्याने डॉक्टरांचे प्रिस्क्रीपशन नसले तरी आम्ही देतो. याशिवाय स्वप्त असल्याने अनेक जण १० गोळ्यांची अख्खी स्ट्रिप घेऊन जातात. गेल्या काही महिन्यात या गोळ्यांची मागणी अचानक वाढल्याचे जाणवले. विशेषत: वडारवाडी व इतर वस्त्यांमधील लोकांकडून गोळ्यांची मागणी वाढल्याचे जाणवले आहे. त्यामुळे आता कोणी गोळी मागितली तर आम्ही एक किंवा दोनच गोळ्या देतो. अशाच प्रकारे इतर काही मेडिकल स्टोअर्समध्ये चौकशी केल्यावर त्यातील एकाने अगोदर किती पाहिजे असे विचारुन १० गोळ्या देण्याची तयारी दर्शविली.  त्यानंतर बातमीदाराने आपली ओळख सांगून चौकशी केल्यावर आम्ही एकावेळी दोन, तीन गोळ्याच देतो, असे सांगितले. दुसऱ्य मेडिकल स्टोअर्सने आता आम्ही या गोळ्या ठेवत नसल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी ओळखीच्या लोकांनाच या गोळ्या दिल्या जात असल्याचे सांगितले जाते.याबाबत डॉक्टर जयंत जोशी यांनी सांगितले की, पोटात मुरडा आल्यावर ही गोळी दिली जाते. तिचा इफेक्ट हा सुमारे दीड तास इतका असतो. त्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर दिवसातून तीन वेळा एक गोळी घेण्यास सांगितले जाते.मात्र, एकाच वेळी पाच, सहा गोळ्या कधीही घेऊ नये.या गोळ्यांचे साईड इफेक्ट खूप आहेत. या गोळ्या सातत्याने घेतल्यास नर्व्हसनेस येतो. या गोळ्या घेतल्यानंतर गाडी अथवा अवजड यंत्रसाम्रुगी चालवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.अल्कोहोलबरोबर या गोळ्या घेतल्या तर आणखी जास्त परिणाम होतो.या गोळ्या सातत्याने घेतल्यास दृष्टी अंधूक होऊ शकते. आकलन करण्याची क्षमता कमी होते़ घाम तयार होण्याच्या यंत्रणेत अडथळा येतो. त्यामुळे श्रमिक व कामगार वर्गाला उन्हाळ्यात घाम कमी आला तर त्यांच्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या गोळ्यांमुळे शॉटटर्म मेमरी लॉस होत असल्याचे या गोळ्यांच्या माहितीमध्ये नमूद केले असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.त्यामुळे आपला मुलगा अथवा जवळचे कोणी या गोळ्या घेत असल्यास पालकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थmedicineऔषधंCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliquor banदारूबंदी