Indian Railway: पुण्यातून उत्तर भारतात दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:12 AM2024-04-26T10:12:04+5:302024-04-26T10:12:38+5:30

या गाड्यांचे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वे विभागाच्या वेबसाइटवर सुरू होईल....

Danapur and Gorakhpur Summer Special Trains from Pune to North India Indian Railway | Indian Railway: पुण्यातून उत्तर भारतात दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या

Indian Railway: पुण्यातून उत्तर भारतात दानापूर आणि गोरखपूर उन्हाळी विशेष गाड्या

पुणे : उन्हाळी सुट्या, लग्नसराई लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वारंवार वाढत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उत्तर भारतात दानापूर आणि गोरखपूरसाठी उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वे विभागाच्या वेबसाइटवर सुरू होईल.

पुणे-दानापूर-पुणे

गाडी क्रमांक ०१०१३ पुणे-दानापूर उन्हाळी विशेष गाडी (दि.२७) एप्रिलला पुण्याहून सायं. १९:५५ वा. सुटेल आणि दानापूरला तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता पोहोचेल. दानापूर ते पुणे ही गाडी क्रमांक ०१०१४ (दि. २९) एप्रिलला सकाळी ०६:३० वाजता दानापूरवरून सुटेल अन् ती पुण्याला दुसऱ्या दिवशी १७.३५ वाजता पोहोचेल.

असे आहेत थांबे : दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

पुणे-गोरखपूरसाठी विशेष २ फेऱ्या :

पुणे-गोरखपूर विशेष गाडी क्रमांक ०१४११ दि. २७ एप्रिलला पुण्याहून ०६:३० वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसऱ्या दिवशी १४:५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१२ गोरखपूर-पुणे ही दि. २८ एप्रिलला गोरखपूरहून १८:२० वाजता सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी ०६:४० वाजता पोहोचेल. असे आहेत थांबे : हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.

Web Title: Danapur and Gorakhpur Summer Special Trains from Pune to North India Indian Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.