शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

दौंडला तोतया पोलिसांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:04 AM

दौंड येथील घटना : खंडणीचा गुन्हा दाखल

दौंड : वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दौंड तालुक्यात हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या ४ तोतया पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे फरार असल्याची माहिती पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांनी दिली.

पंकज मिसाळ (वय २८, रा. निमगाव केतकी, इंदापूर), राहुल चव्हाण (वय २०, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), अंकिता भोसले (वय २९), प्रज्ञा भोसले (वय २१ , दोघीही रा. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे, तर ओंकार शितोळे (रा. पाटस , ता. दौंड), दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. इंदापूर) हे दोघे फरार झाले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गिरीम फाटा येथील साई पॅलेस हॉटेलजवळ एका गाडीतून ४ तरुण आणि २ तरुणी उतरल्या. दरम्यान, या वेळी त्यांनी हॉटेलच्या काउंटरला घेरा घातला. यावेळी त्यांनी हॉटेल व्यावसायिकाला तुमच्या हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असतो. आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहोत, असे सांगून यातील एकाने काउंटरच्या गल्ल्यात हात घालून ३० हजार काढून घेतले. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितल. अंकिता भोसले हिच्याकडे भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे ओळखपत्र होते. ओळखपत्र हॉटेलचालकाला दाखविले. यानंतर त्याने २५ हजार रुपये दिले. यानंतर ते पैसे घेऊन ते पसार झाले. हॉटेलमध्ये झालेल्या गोंधळावरून हॉटेलचालक चंद्रशेखर रेड्डी (रा. गजानन सोसायटी, दौंड) यांना शंका आल्याने त्यांनी तोतया पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला.हे तोतया पोलीस खडकी येथील बब्बी ढाबाचालक रवी पुजारी याला धमकावत होते, हा प्रकार तोतया रेड्डी यांनी पाहिला. रवी पुजारी यांनी तोतया पोलिसांना वीस हजार रुपये दिले. काही वेळेतच पुजारी यांनी रावणगाव पोलिसांबरोबर संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. याप्रसंगी तोतया पोलिसांची धांदल उडाली. यातील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले तर दोघे भिंतीवरून उड्या मारून पळाले. याप्रकरणातील आरोपी पंकज मिसाळ हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहेत.चोरी करणाºयांना हटकल्याने मारहाणसांगवी : येथील एका शेतातून पीकाची चोरी करत असतांना शेतमालकाने चोरट्यांना हटकल्याने त्यांना चोरट्यांनी पिस्तूल दाखवत, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश खंडू लोखंडे (वय ४०, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपी बेंबट्या आजिनाथ भोसले, दत्ता आजिनाथ भोसले, अकबर आजिनाथ भोसले, विजा आजिनाथ भोसले, सागर आजिनाथ भोसले, गोविंद ऊर्फ गोट्या दुर्योधन काळे, हिंदूराव सयाजी पवार, चैत्री अजिनाथ भोसले, अश्विनी बेंबट्या भोसले, सुनीता दत्ता भोसले, मर्दानी अकबर भोसले, अक्षय पवार, चांदणी अक्षय पवार, करण जकल पवार, नीलम करण पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवार (दि.११) लोखंडे यांना डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे शेतातील भोपळ्याचे पीक चैत्री आजिनाथ भोसले हिच्या सुना पोत्यात भरून नेत असल्याचे दिसले. यावेळी लोखंडे यांनी त्यांना हटकले. त्यावर उलट चोरी करणाºया महिलांनी लोखंडे यांच्यावर धावून जात तुझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात छेडछाड व जातीवाचक बोलण्याची तक्रार देईन, तुझ्याकडे बघून घेऊ असे म्हणत, सर्व लोखंडे यांच्या घरात घुसले. लोखंडे यांच्या पत्नी व त्यांना शिवीगाळ दमदाटी केली. यानंतर बेंबट्या भोसले याने कमरेचा पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर महिलांनी त्यांच्या पत्नीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्याजवळ असलेले १ हजार ८२० रुपये हिसकावून घेतले. तर करण पवार याने फिर्यादीच्या मानेवर कोयता ठेवून बारामती येथे भाडोत्री गाळा घेण्यासाठी मित्रांकडून घेतलेले ६ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन निघून गेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी