शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 5:53 PM

प्लास्टिक बंदी लागू करताना दूध व्यावसायिकांनी विक्री केल्या दूध पिशव्या पुन्हा संकलित करण्याची अट घातली आहे.

ठळक मुद्देदूध पिशवी संकलनाला विरोध : सक्ती केल्यास सुट्टे दूध विक्री करण्याचा निर्णय

पुणे : प्लास्टिक बंदी लागू करताना दूध व्यावसायिकांनी विक्री केल्या दूध पिशव्या पुन्हा संकलित करण्याची अट घातली आहे. मात्र, व्यावसायिकांना विक्री केलेल्या पिशव्या संकलित करणे अडचणीचे आहे. सरकारने त्यावर योग्य पर्याय उपलब्ध करुन न दिल्यास ३० जुलै पासून दुग्ध व्यावसायिक शहरातील रस्त्यांवर बसून सुट्ट्या दुधाची विक्री करतील, असा इशारा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दिला आहे.प्लास्टिक बंदी, दुधाच्या प्लास्टिक पिशव्या व प्रक्रिया, दुग्ध व्यावसायिकांचे थकीत अनुदान अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दूध संघाची सोमवारी पुण्यातील एका हॉटेलमधे बैठक झाली. त्यात ४६ डेअरींचे ७५ प्रतिनिधी आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाºया कंपनीचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. आधीच दुग्ध व्यवसाय अडचणीतून जात आहे. या उद्योगाला मदत करण्याऐवजी दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर निर्बंध घालून सरकार या अडचणीत वाढ  करीत आहे. ग्राहकांना विकलेल्या दुधाच्या पिशव्य पुन्हा संकलित करणे व्यवहारिकदृष्ट्या शक्य नाही. जर, प्लास्टिक पिशवी बंद झाल्यास ग्राहकांना सकस दूध मिळेल याची खात्री नाही. पिशवीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. सरकारला प्लॅस्टीक पिशव्या गोळा करण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकायची असेल तर त्यांनी महानंदमधे प्रथदर्शी प्रकल्प सुरु केला पाहिजे. त्यानंतर इतर दुग्ध व्यावसायिकांना प्लॅस्कीटक पिशव्या संकलनाची जबाबदारी दिली पाहीजे. सध्या दुधाचा प्रवास डेअरी, वितरक, दुकानदार आणि घरपोच सेवा देणारे आणि ग्राहक असा आहे. यासाठी विविध घटकांना ५ ते दहा रुपये प्रतिलिटर मोबदला द्यावा लागतो. रिकाम्या पिशव्या पुन्हा गोळा करायच्या असतील तर उलट प्रक्रिया राबवावी लागेल. त्याचा भुर्दंड ग्राहकांवरच पडेल. स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारनेच प्लॅस्टीक पिशव्यांच्या संकलनाची आणि त्यावर प्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली पाहीजे. त्यासाठी गरजे नुसार स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. दूध खरेदीसाठी यापूर्वी जसे अनुदान दिले होते. त्या प्रमाणे प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी सुरुवातीच्या काळात अनुदान देता येईल का? याचाही विचार झाला पाहिजे, असे मत दूध व्यावसायिकांनी मांडल्याची माहिती दूध संघाचे सचिव प्रकाश कुतवळ आणि उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. ----------------महापालिकेने घेतला दूध पिशवी संकलनाचा आढावादूध प्लॅस्टीक पिशवी संकलनासाठी डेअरी मालकांकडून कोणते उपाय करण्यात येत आहे, त्याचा आढावा महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सोमवारी घेतला. पिशव्यांचे संकलन, प्रक्रिया आणि प्रकल्प करण्यासाठी लागणारी जागा याची माहिती देण्याची सूचना मोळक यांनी डेअरी व्यावसायिकांना केली. 

टॅग्स :PuneपुणेmilkदूधPlastic banप्लॅस्टिक बंदीGovernmentसरकार