शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या स्वयंपाकावेळी सिलेंडरने घेतला पेट ; अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:32 IST

शाळेत वारकरी मुक्कामास असताना स्वयंपाकावेळी एका गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला.

ठळक मुद्देअग्निशामक दलाच्या तत्परतेने आग विझवून अनर्थ टळला

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांच्या पालखींचे बुधवारी सायंकाळी पुण्यनगरीत आगमन झाले. या पालखी सोहळ्यामुळे शहरातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.परंतु, आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास ढोले पाटील गणपती मंदिरानजीक असणाऱ्या शाळेत वारकरी मुक्कामास असताना स्वयंपाकावेळी एका गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने गोंधळ  उडाला. पण अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे  पुढील अनर्थ टळला.अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच नायडू अग्निशामक केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल तातडीने रवाना झाले.गॅस सिलेंडरने रेग्युलेटरच्या ठिकाणी पेट घेतल्याचे पाहताच आगीवर पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाने तत्परतेने आग विझवून अनर्थ टाळल्याने वारकऱ्यांनी जवानांचे आभार मानले. या कामगिरीमध्ये नायडू अग्निशामक केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, वाहन चालक सतिश श्रीसुंदर, तांडेल विजय चौरे, जवान गणेश कुंभार, भालचंद्र गव्हाणकर व देवदूत जवान अमृत रुपनर, दिपक कोकरे, किशोर गाडे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल