शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 16:09 IST

घरगुती सिलेंडर व्यावसायिक चढ्या दराने भरून देताना घडली घटना 

ठळक मुद्देआरोपीसह जागा मालक व गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हे दाखल

कात्रज : घरगुती सिंलेडर व्यावसायिक सिंलेडरमध्ये भरून चढ्या दराने बाजारात विक्री करण्याच्या अड्ड्यावर ते भरत असताना शुक्रवारी रात्री ११.३० च्या  भीषण स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी ( दि.७) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.  या स्फोटात तीन जण जखमी झाले असुन एकाची प्रकृती गंभीर आहे.या स्फोटाच्या आवाजाने दोन किलोमीटर परिसर हादरला. 

         सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून सुरु राजू विष्णोई यांचा अप्पर,इंदिरा नगर भाड्याच्या घरामध्ये घरगुती सिंलेडर व्यावसायिक सिंलेडरमध्ये भरून चढ्या दराने बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय मागील अनेक दिवसापासुन सुरु केला होता.रात्री राजू विष्णोई हेच काम करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला.  यामध्ये अपघातामध्ये राजू विष्णोई गंभीर जखमी झाले असुन इतर दोन नागरिक झखमी झाले आहे. सुदैवाने कुटलीही जीवितहानी झाली नाही.

   पोलिसांनी या घटनास्थळावरून ३१ गॅसचे सिलेंडर जप्त केले आहेत.तसेच.बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले की,आरोपीसह जागा मालक व गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बिबवेवाडी भागामधील सर्व गोडाऊन व संशयित घरांची पाहणी करून हे प्रकार बंद होतील याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

               या स्फोटात शर्मिला खोमणे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असुन त्यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले की,  याची तक्रार आम्ही येथील स्थानिक लोकप्रतिनिधीकडे केली होती. मात्र याची दखल घेतली गेली नसल्याने हा प्रकार घडला.या स्फोटामध्ये मला व माझ्या पतीला देखील दुखापत झाली आहे.आमचे घर कधीही पडु शकते. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला येथे राहू नका असे सांगितले आहे.मात्र आम्ही आता कुठे जायचे हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे.      

  अप्पर मध्ये मागील तीन महिन्यात ही दुसरी घटना घडलेली आहे.अशाप्रकारे अवैधपणे सिलेडरचे गोडाऊन किंवा घरात ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.बिबवेवाडीतील अनेक गोडाऊनमध्ये असे विनापरवाना सिंलेडर पाहायला मिळत आहेत.- रुपाली धाडवे , नगरसेविका 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटPoliceपोलिस