शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; फळबागा व शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:07 IST

३ लोक जखमी, जिल्ह्यात १९० ठिकाणी घरांची पडझड

पुणे : गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळाच्या तुलनेत रविवार-सोमवारी झालेल्या तौत्के चक्रीवादळाने जिल्ह्यात कमी नुकसान झाले. घराच्या पडझडीत तीन लोक किरकोळ जखमी झाले तर खेड, मुळशी, भोर, माधळ आणि आंबेगाव तालुक्यात घरांची, काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले 190 ठिकाणी पडझड झाली. दरम्यान या चक्रीवादळाचा फळबागांना फटका बसला असून,  तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रविवार (दि.16) आणि सोमवार (दि.17) रोजी जिल्ह्यातील काही तालुक्यात या चक्रीवादळाचा चांगला परिणाम दिसून आला. परंतु गतवर्षी जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळात जीवितहानीसह हजारो घरांचे, लाईटचे खांब, शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये, पोल्ट्री फार्म, पाॅलीहाऊस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळेच हवामान विभागाच्या तौक्ते चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये धास्तीचे वातावरण होते. परंतु या वादळात फारसे नुकसान झाले नाही. अद्याप पूर्ण धोका टळला नसून,  मंगळवार दुपारपर्यंत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, शिरूर तालुक्यात १ घराची पडछड झालेने २ व्यक्ती यात फिरकोळ जखमी झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. तर खेड तालुक्यात एका घराची पडछड झालेने व्यक्ती जखमी झालेने सदरव्यक्तीस प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. बारामती तालुक्यातील विद्युत वाहिनीचा शॉक बसल्याने २ शेळया व २ मेढया मयत झाल्या. मुळशी तालुक्यामध्ये खांबोली गावातील जि. प. प्राथमिक शाळेचे पत्रे उडल्याने नुकसान झालेले आहे. तसंच ताम्हिणी गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले.

खेड तालुक्यातील दिवेगांव गावातील एक प्राथमिक शाळाचे संपूर्ण पत्रे उडून गेले.भोरगिरी गावातील ग्रामपंचायत व दोन अंगणवाडीचे पत्रे उडून गेले. सद्यस्थितीत घाटमाथा परिसरामध्ये पाऊस पडत असून, नुकसानीचे अंतिम आकडेवारी दोन दिवसांत निश्चित होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले. ------

घोडेगाव - आंबेगाव तालुक्यात तौत्के चक्रीवादळाचा काहि ठिकाणी फटका बसला. तालुक्यातील घाट माथ्यावर राहणाऱ्या मोजक्या काही घरांचे छत उडाले, जुन्या भिंती व झाडे उन्मळून पडली.  वाऱ्याला प्रचंड वेग होता, यामध्ये आदिवासी भागातील काही घरांचे छत उडाले तर फलौंदे येथील घराची भिंत पडली. 

क्षेत्र भीमाशंकर तसेच डिंभे पासून वर पश्चिम भागात या चक्रीवादळात लाईटच्या पोलवर झाडे पडल्याने सगळया गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. मागील दोन दिवसांपासून या भागात लाईट नाही. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते.

घरांची अशी झाली पडझड मुळशी -75, भोर-09, मावळ- 10, खेड- 95, आंबेगाव-01---------

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcycloneचक्रीवादळTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ