भांडणाचे निमित्त ठरले सायकलचा वॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 16:19 IST2019-12-02T16:19:08+5:302019-12-02T16:19:27+5:30
भांडणाला कोणतेही निमित्त पुरते म्हणतात ना़..तसं

भांडणाचे निमित्त ठरले सायकलचा वॉल
पुणे : सायकल नीट करण्यासाठी टाकली असताना त्याचा वॉल जुना बसविला की नवीन हे भांडणाचे कारण होऊ शकते का ? पण भांडणाला कोणतेही निमित्त पुरते म्हणतात ना़.. तसाच काहीचा प्रकार कोंढव्यातील एनआयबीएम येथील प्रिया सायकल सिटी या दुकानात घडला़. वॉल जुना लावला की नवीन यावरुन झालेल्या वादात दुकानदाराला मारहाण करुन जखमी करण्यात आले़.
याप्रकरणी मुकेश अशोक शिंदे (वय ३२, रा़ भैरवनाथ तालीम जवळ, रोकडे बिल्डिंग) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयशा खान, मोईन अंजुम शेख (वय २४, रा़ मिठानगर, कोंढवा), मोसिन व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. मोईन शेख याला अटक केली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुकेश शिंदे यांचे प्रिया सायकल सिटी हे दुकान आहे़. मोईन शेख यांच्या वडिलांनी सायकल दुरुस्त करण्यासाठी दुकानात दिली होती़. आयशा खान या ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता सायकल घेण्यासाठी आले़. त्यांनी शिंदे यांना सायकलला वॉल जुना बसवला की नवीन असे बोलून वाद घातला़. त्यानंतर इतर जण आले व त्यांनी शिंदे यांना शिवीगाळ करुन पाणी पिण्याचे तांब्या फेकून मारला़. तो शिंदे यांच्या डोक्याला लागून त्यात ते जखमी झाले़.