शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पुणे शहरातील सायकल ‘शेअरिंग’ थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:02 PM

प्रतिसादाअभावी कंपन्यांनी गुंडाळला गाशा :

ठळक मुद्देप्रशासन कमी पडले; वापरही चुकीच्या पद्धतीनेतत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सायकल शेअरिंग योजना केली सुरू प्रत्येक कंपन्यांनी २ हजार चांगल्या दर्जाच्या, परदेशी बनावटीच्या सायकली करुन दिल्या उपलब्ध

पुणे : स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेची सायकल शेअरिंग योजना जवळपास बंद पडल्यात जमा आहे. चार कंपन्यांपैकी एकाच कंपनीने ही योजना सुरू ठेवली असून अन्य तीन कंपन्यांनी आपल्या सायकलींसह गाशा गुंडाळला आहे. जनजागृती करण्यासाठी कमी पडलेले प्रशासन व नागरिकांकडून अयोग्य पद्धतीने झालेला वापर यामुळे या प्रकल्पाला टाळे लागले आहे.तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सायकल शेअरिंग योजना सुरू केली. त्यासाठी काही परदेशी व काही देशी कंपन्यांबरोबर पालिकेने करार केला. त्यांच्याबरोबर कमी वेळासाठी कमी भाडे आकारण्याचा करार करून पालिकेने त्यांना सायकल ठेवण्यासाठी मोकळ्या जागा उपलब्ध करून दिल्या.प्रत्येक कंपन्यांनी २ हजार चांगल्या दर्जाच्या, परदेशी बनावटीच्या सायकली उपलब्ध करुन दिल्या. अवघ्या १ रुपयांत अर्धा तास या योजनेला सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र हळूहळू या योजनेचा प्रतिसाद कमी होत गेला. काही सायकली चोरीला गेल्या. त्याला बसवलेल्या जीपीएस यंत्रणेमुळे त्या सापडल्या. पुण्यात काही ठिकाणी तर सायकली झाडांवर टांगून ठेवलेल्या आढळल्या. तरीही कंपन्यांनी नेटाने सहा महिने ही योजना सुरू ठेवली. काही दिवसानंतर कंपन्यांनी ५ रुपये तास व त्यानंतर १० रुपये तास सुरू केला. काही दिवसांनी सायकल पळवून नेणे कमी झाले, पण त्याची मोडतोड सुरू झाली. मोडलेल्या सायकली तशाच ठेवणे सुरू झाले. त्या दुरूस्त करून कंपन्या पुन्हा ठेवू लागल्या तर नव्या सायकलींचे सिट काढणे, हँडल वाकडे करणे, असे प्रकार सुरू झाले. कंपन्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेना. दरम्यानच्या काळात आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाली. त्यांच्याशिवाय प्रशासनात कोणालाही या प्रकल्पात रस नव्हता. सायकल कंपन्यांचे पुण्यात आलेले प्रतिनिधीही उदासिन झाले. सायकली पदपथांवर ठरलेल्या ठिकाणी लावणे, त्यांची सातत्याने पाहणी करणे हे त्यांच्यासाठी वेळखाऊ ठरू लागले. त्यामुळेच आता एक कंपनी वगळता अन्य तीन कंपन्यांनी आपल्या सायकली काढून घेतल्या आहेत. एकाच कंपनीच्या सायकली सध्या शिल्लक असून त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. सायकल योजनेसाठी पालिकेने ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यात खास सायकल ट्रॅक, कमी गर्दीच्या रस्त्यावरचे वेगळे, गर्दीच्या रस्त्यांवरचे वेगळे सायकल ट्रॅक अशा अनेक गोष्टी यात आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरीही मिळाली. पालिकेत त्यासाठी स्वतंत्र सायकल कक्ष तयार करण्यात आला. तिथे अधीक्षक अभियंता दर्जाचे प्रमुख नियुक्त करण्यात आले. कुणाल कुमार यांच्या बदलीमुळे यातील काहीही प्रत्यक्षात आले नाही..........योजना सुरूच आहे...काही कारणांनी सायकल शेअरिंग थांबले म्हणजे सायकल योजना बंद पडली असे होत नाही. पालिका अर्बन डिझाईन प्रकल्पात जे पदपथ तयार करत आहे, त्यात वेगळे सायकल ट्रॅक तयार केले जात आहेत. संभाजी उद्यान रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय येथील पदपथ तसेच तयार केले आहे. पालिकेचा एक सायकल ग्रुप असून त्याचे ७०० सदस्य आहेत. असेच अनेक ग्रुप शहरात आहेत. त्यामुळे सायकल योजना सुरू आहे, मात्र त्याला उल्लेखनीय प्रतिसाद अजून मिळालेला नाही असे म्हणता येईल. त्यासाठी पालिका प्रयत्न करते आहे.    - नरेंद्र साळुंखे, अधीक्षक अभियंता, सायकल प्रकल्प, महापालिका.......महापालिकेकडून सपोर्ट हवा होतासायकल चालवायची तर त्यासाठी रस्त्यांवर तसे वातावरण, सुरक्षा, सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. सायकल स्टेशन्स नावाची एक चांगली कल्पना पालिकेच्या सायकल धोरणात होती. त्यावर पुढे काहीही झाले नाही. सायकल योजनेत फार मोठी उदासीनता पालिका प्रशासनाने दाखवली. - वरिष्ठ अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी..........का झाले शेअरिंग अयशस्वी?सायकली परदेशी बनावटीच्या होत्या. वापरासाठी सुलभ वाटाव्यात अशा नव्हत्या.मोबाइलवर स्कॅनिंग करून लॉक उघडणे, पैसे जमा करणे सर्वसामान्य नागरिकांना अवघड वाटत होते.सायकल नेली व काम झाले की नंतर ती जमा कुठे करायची हे निश्चित नव्हते. ठिकाणा शोधायला लागायचेमहिलांसाठी वेगळ्या सायकली नव्हत्या.उंची कमी असल्यामुळे सायकल बराच वेळ चालवणे अवघड व्हायचे

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगkunal kumarकुणाल कुमारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका