Cyber Fraud: सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे अन् कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 09:54 AM2023-07-06T09:54:01+5:302023-07-06T09:54:51+5:30

अशी करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार...

Cyber Fraud Where and how to report cyber fraud pune latest crime news | Cyber Fraud: सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे अन् कशी कराल?

Cyber Fraud: सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे अन् कशी कराल?

googlenewsNext

पुणे : भारतात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे वाढत असल्याचे रोजच्या बातम्यांवरून लक्षात येते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोक सायबर गुन्ह्यांची तक्रार करत नाहीत; कारण सायबर फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार कुठे आणि कशी नोंदवायची याची माहितीच नसते.

सायबर फसवणूक हा ऑनलाइन गुन्ह्यांचा एक प्रकार आहे. जिथे गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून त्यांच्या पीडितांकडून पैसे किंवा संवेदनशील माहिती चोरतात. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी, पीडितांकडे दोन पर्याय आहेत. ते एकतर जवळच्या पोलिस स्टेशनला भेट देऊ शकतात किंवा cybercrime.gov.in द्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. अथवा १९३० हा टोल फ्री नंबर डायल करूनसुद्धा तक्रार नोंदवता येते.

अशी करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार...

१. https://cybercrime.gov.in/ ला भेट द्या.

२. मुख्यपृष्ठावरील ‘तक्रार दाखल करा’वर क्लिक करा.

३. अटी व शर्ती वाचा आणि ‘मी स्वीकारतो’वर क्लिक करा.

४. ‘रिपोर्ट सायबर क्राईम’वर क्लिक करा.

५. ‘नवीन वापरकर्त्यासाठी येथे क्लिक करा’ निवडा आणि तुमचे राज्य, नाव, ईमेल, फोन नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.

६. तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेला ओटीपी एंटर करा आणि कॅप्चा काेड भरा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

७. फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या सायबर क्राइमची तक्रार करायची आहे त्याचे तपशील भरा, जे चार भागांमध्ये विभागलेले आहे: सामान्य माहिती, बळी माहिती, सायबर गुन्ह्यांची माहिती आणि पूर्वावलोकन.

८. सर्व संबंधित तपशील आणि गुन्ह्याचे सहायक पुरावे, जसे की स्क्रीनशॉट किंवा फाइल समाविष्ट केल्याचे सुनिश्चित करा.

९. एकदा तुम्ही माहितीचे पुनरावलोकन आणि पुष्टी केल्यानंतर, ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

गोल्डन अवरमध्ये करा तक्रार :

गोल्डन अवर म्हणजेच फसवणूक झाल्यानंतरचा एक तास महत्त्वाचा असतो, फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा. त्यामुळे पोलिसांना तुमचे पैसे ज्या खात्यात गेले असतील, ते गोठवणे शक्य होऊ शकते. आणि गेलेले पैसे परत मिळणे शक्य होऊ शकते. ऑनलाइन फसवणूक घडल्यास ७०५८७१९३७१/ ७०५८७१९३७५ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवता येते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Cyber Fraud Where and how to report cyber fraud pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.