शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 21:36 IST

हरियाणा पोलिसांनी ४५ लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता

पुणे : हरियाणा आणि दिल्लीमधील तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व शिवाजीनगर परिसरात वेशांतर करुन राहणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली आहे. जाफर अलिखान ईराणी (वय ३०, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

हरियाणा पोलिसांनी ४५ लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता. त्यामुळे ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. यामुळे हरियाणा पोलीसही त्याच्या मागावर होते. शिवाजीनगर पोलीस रविवारी पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील विष्णूकृपानगर या इराणी वस्तीमध्ये एक जण त्यांना पाहून पळून जाऊ लागला होता. त्याला पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जाफर इराणी असे नाव सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याला नुकतेच कोंढवा पोलिसांनी अटक केले होते. या गुन्हयात तो जामिनावर बाहेर आलेला असल्याचे समजले. तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेबाबत माहिती प्राप्त झाली.

त्याच्याविषयी अधिक चौकशी केली असता हरियाणा व दिल्ली येथे तो मोस्ट वॉन्टेड असून एकूण २२ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यापैकी हरियानातील हिसार पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याने कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन एक किलो सोने ४५ लाख रुपयांची चोरी केली आहे. हिसार पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेत असताना त्याच्या देखरेखीवर असलेल्या पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता.जाफर इराणी याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, पोलीस उप निरीक्षक भैरवनाथ शेळके, विनोद महागडे, विजय पानकर, हवालादार बशीर सय्यद, पोलीस अंमलदार राहुल होळकर, अनिकेत भिंगारे, अविनाश पुंडे, ज्ञानेश माने, अमोल कोल्हे या पथकाने केली.

जाफर हा मुळचा पुण्यातील असून गेल्या वर्षी सप्टेबरमध्ये त्याने हरियाना, लुधियाना, दिल्ली येथे पोलीस अधिकारी, कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणूक केली आहे.   

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी