कुरवंडी कडा धोकादायक
By Admin | Updated: October 18, 2014 22:55 IST2014-10-18T22:55:56+5:302014-10-18T22:55:56+5:30
पेठ-कुरवंडी-घोडेगाव (ता. आंबेगाव) मार्गावरील कुरवंडी घाटातील दुस:या वळणावरची टेकडी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुरवंडी कडा धोकादायक
4पेठ : पेठ-कुरवंडी-घोडेगाव (ता. आंबेगाव) मार्गावरील कुरवंडी घाटातील दुस:या वळणावरची टेकडी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील मध्यभागावर असलेली दरड कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या दरडीची त्वरित पाहणी करून त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी पेठ कुरंवंडी घाट मार्गे घोडेगावला जाणा:या प्रवाशी व वाहनचालकांनी केली आहे.
4पेठ मार्गे कुरवंडी या मार्गावरून घोडेगाव येथे जाण्यासाठी रोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. या रस्त्यावरून सातगाव पठार भागातील थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी आदी गावांतील नागरिकांना घोडेगांव हे तालुक्याचे गाव जवळ पडते. परंतु या मार्गावरील कुरवंडी घाटरस्ता हा अतिशय नागमोडी वळणांचा आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे येथील नागरिक सांगतात.
4या घाटातील घोडेगावच्या बाजूने कुरवंडीकडे येताना घाटातील दुस:या वळणावरच्या टेकडीचा कडा रस्त्याचे बांधकाम करताना तोडला होता. आता त्याला अनेक वर्षे झाली. मात्र सततची वाहनांची वर्दळ तसेच ऊन, वारा, पाऊस त्यामुळे या डोंगराचा कडा सैल झाला आहे. त्यामुळे डोंगर कडा रस्त्यावर कधीही कोसळू शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने या परिसराची पाहणी करून या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी केली आहे.