वारजे माळवाडी: एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली. वन विभाग, एनडीए प्रशासन व तसेच वारजे व उत्तमनगर पोलिसांनी बराच वेळ शोध घेतला.. तसेच बिबट्याला पाहण्यासाठी न दिसल्याने शेवटी बिबट्या दिसला ही अफवाच असल्याचे सिध्द झाले आहे. याबाबत पोलीस व वन प्रशासनातर्फे दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. दुपारी बाराच्या सुमारास वारज्यातून शिवणेकडे पायी जाणाऱ्या व्यक्तीस एनडीएच्या सीमाभिंतीजवळ बिबट्या नजरेस पडला. त्याने आरडा ओरड केल्यावर हा बिबट्या आतमध्ये दाट झाडीत पळून गेला आहे. दुसरी शक्यता वारज्यातील मुंबई- बंगळुरू महामार्गाजवळ डुक्कर खिंड भागात देवयानी इमारत आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेस सकाळी बिबट्या दिसल्याची देखील चर्चा रंगली होती. सदर महिलेने माहिती कळवण्याच्या वृत्तास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके यांनी वृत्तास दुजोरा दिला. पण त्या महिलेशी संपर्क होत नसल्याचेही त्यांनी मान्य केले.
उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:11 IST